Chinchwad News : बांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवर वापरली जाणारी लिफ्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सात एप्रिल रोजी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

विलास किरू राठोड (वय 38, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे बांधकाम साइटवर वापरली जाणारी लिफ्ट आहे. ही लिफ्ट फिर्यादी यांनी वाल्हेकरवाडी ते गुरुद्वारा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोंडवे वस्ती येथे ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दोन लाख रुपये किंमतीची लिफ्ट चोरून नेली. याबाबत 18 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.