Chakan : मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध

एमपीसी न्यूज – बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत चाकण (ता.खेड, जि.पुणे) येथे शुक्रवारी (दि.३१ मे) मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अकरा जोडपी विवाह बंधनात अडकली. वधूवरांना संसारोपयोगी वस्तू बरोबर, तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी गावासाठी चाकण पतसंस्था, महावीर पतसंस्था, चाकण दुग्ध संस्था यांच्या वतीने पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या.  वधू वर यांना शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ज्येष्ठ नेते नाना टाकळकर, आमदार सुरेश गोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

आमदार सुरेश गोरे मित्र परिवार मानव विकास कल्याण ट्रस्ट, समस्थ ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या पुढाकाराने खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण येथे  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे २७ वे वर्ष आहे. येथील मार्केटयार्डच्या भव्य प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हा सोहळा संपन्न झाला. यावेळी  जिल्हा प्रमुख राम गावडे, शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, महेश शेवकरी, महिला आघाडी प्रमुख नंदा कड, विजया शिंदे , विजया जाधव,  अशोक खांडेभराड, मा. जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे , भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, रामदास धनवटे, दिलीप मेदगे, जि. प. सदस्य बाबाजी काळे, सदस्या तनुजा घनवट,

रुपाली कड, सभापती सुभद्रा शिंदे, मनीषा गोरे, सविता गोरे, आशा गोरे, उपसभापती भगवान पोखरकर, पं स.सदस्य, अंकुश राक्षे, अमर कांबळे, मच्छिंद्र गावडे. सदस्या वैशाली जाधव, ज्योती अरगडे, सुनीता सांडभोर,मारुती सातकर, कैलास गाळव, सुदाम कराळे, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक राजेंद्र गोरे, किशोर शेवकारी, ऋषिकेश झगडे, मंगल गोरे, सुजाता मंडलिक, हुमा शेख, सारिका घुमटकर, स्नेहा जगताप, शंकर राक्षे, निलेश गोरे, धीरज मुटके,प्रवीण गोरे, सुरेखा गालफाडे, रामदास जाधव, उमेश गोरे, महेंद्र कांबळे, पो. पा. वसंतराव गोरे , यात्रा कमिटी अध्यक्ष किसन गोरे, दत्ताभाऊ गोरे, विकास गोरे, नितीन गोरे, बिपीन रासकर, आदींसह चाकणकर मोठ्या संखेने उपस्थित होते.

स्वागत नगराध्यक्ष शेखर घोगरे व उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांनी केले, आभार प्रकाश वाडेकर यांनी ; तर सूत्र संचलन रामदास जाधव, अशोक जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.