Chakan News : जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला अकरा जणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून अकरा जणांनी मिळून एका महिलेला बेदम मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी खेड तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर संतोषनगर (भाम) येथे घडली.

गुलाब बाबुराव कड (वय 57, रा. संतोषनगर भाम, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव शिवेकर, प्रमोद सावंत, विनायक सावंत, गुलाब शिवेकर, कुमार शिवेकर, अक्षय शिवेकर, सोमनाथ सावंत, गुलाब शिवेकर यांची पत्नी आणि इतर तीन महिला (सर्व रा. शिरोली, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे संतोषनगर भाम येथे सुपरमार्केट दुकान आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानासमोर येऊन फिर्यादी यांच्या पत्नीला लाकडी काठीने, लोखंडी गजाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या पत्नीच्या डोक्याला, पाठीवर, पायावर, हातावर दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.