Pune News : संतापजनक… घराशेजारी राहणाऱ्या वृद्धाकडून अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक संतापजनक घटना उघडकीस आली. घरा शेजारी राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकांनी चॉकलेटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या आईचा हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. खडक पोलिसांनी यातील 65 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  आरोपीविरोधात पॉक्सो कलम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महिला ही 30 वर्षे असून तिला अकरा वर्ष वयाची मुलगी आहे. आरोपी हा त्यांच्या ओळखीचाच होता. तो वारंवार घरी यायचा आणि या मुली सोबत खेळत असायचा. दरम्यान चॉकलेटचा आमिषाने त्याने तिला आपल्या घरी नेले आणि तिथे गेल्यानंतर ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

बुधवारी सायंकाळी देखील त्याने असाच प्रकार केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.