Bopodi News : बोपोडीच्या शाळेत भरणार अकरावी आणि बारावीचे वर्ग

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या बोपोडी उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी आणि बारावीचे सुरु करण्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्ग चालविण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.