Pune : अकरावीला अॅडमिशन न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यात एका 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

आकाश ज्ञानेश्वर सदाफुले असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, महाविद्यालयात अकरावीला अॅडमिशन न मिळाल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.