Elgar Parishad : एल्गार परिषद प्रकरणी NIA कडून हॅनी बाबूला अटक

Hani Babu arrested by NIA in Elgar Council case : हॅनी बाबूला  उद्या ( बुधवारी )मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी हॅनी बाबू मुसलीयर्वेतिल थरिल (वय. 54, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. हॅनी बाबू दिल्ली विद्यापीठात इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

हॅनी बाबूला  उद्या ( बुधवारी )मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील शनिवारवाडा येथे कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेदरम्यान प्रक्षोभक भाषणे देण्यासंदर्भात विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये सर्वप्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पुढील तपासात सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे ज्येष्ठ नेते, एल्गार परिषदेच्या आयोजक तसेच या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात होते असे निष्पण्ण झाले.

त्यानुसार पुणे पोलिसांनी अनुक्रमे 15 नोव्हेंबर 2018 आणि 21 फेब्रुवारी 2019 रोजी पूरक आरोपपत्र दाखल केले होते.

त्यानंतर 24 जानेवारी रोजी या प्रकरणाचा तपास एनआयएनेकडे सोपविण्यात आला होता. एनआयएने आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा या दोघांना 14 एप्रिल 2020 रोजी अटक केली. त्यानंतर आता हॅनी बाबू मुसलीयर्वेतिल थरिल याला अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like