Dehuroad News : मित्राच्या मित्राला दिलेल्या सफारी कारचा अपहार

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने मित्राच्या मित्राला त्यांची तीन लाख रुपये किंमतीची टाटा सफारी कार दिली. ती कार परत न करता मित्राच्या मित्राने कारचा अपहार केला. ही घटना 13 जानेवारी 2020 रोजी भोंडवे कॉर्नर रावेत येथे घडली. याबाबत तब्बल दीड वर्षानंतर सात जुलै 2021 रोजी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जयेश हरीश ठक्कर (रा. गुरुकुल टेनामेंट, ता. गांधीधाम, जि. कच्छ, गुजरात) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रविकांत बालेश्‍वर पासवान (वय 34, रा. हिंजवडी. मूळ रा. बिहार) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पासवान यांनी त्यांची तीन लाख रुपये किंमतीची टाटा सफारी गाडी (एम एच 14 / एफ जी 2527) त्यांच्या ओळखीचा मित्र अब्दुल सलाम बैतुल्ला याच्या ओळखीचा मित्र आरोपी जयेश ठक्कर याच्याकडे विश्वासाने ठेवली. ती गाडी आरोपीने फिर्यादी यांना परत देण्यास नकार देऊन तिचा अपहार केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.