Chakan : वेगवेगळी बिले बनवून 20 लाख 31 हजारांचा अपहार

कर्मचा-यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणा-या कर्मचा-याने वेगवेगळी बिले बनवून 20 लाख 31 हजार 117 रुपयांचा अपहार केला. हा प्रकार 21 जानेवारी 2019 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत खेड तालुक्यातील निघोजे येथे ए डी सी एल फॅपिको इंजिनिअरिंग या कंपनीत घडला.

सुभाष लक्ष्मण बालटे (रा. च-होली रोड, आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. याबाबत निशांत सिद्राम कांबळे (वय 42, रा. चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. 29) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथील ए डी सी एल फॅपिको इंजिनिअरिंग या कंपनीत फिर्यादी कांबळे आणि आरोपी बालटे काम करतात. आरोपीने 21 जानेवारी 2019 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत वेळोवेळी वेगवेळी बिले बनवून कंपनीकडून 20 लाख 31 हजार 117 रुपये स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतले. सर्व रकमेचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.