Pimpri : तीन महिन्यात चालू कामे पूर्ण करण्यावर भर देणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अनेक विकासकामे चालू आहेत. त्यासाठी शहरात खोदाई केली आहे. खड्ड्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आगामी तीन महिन्यात कोणतेही नवीन काम हाती घेतले जाणार नाही. सध्या चालू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच मागील दोन वर्षात केवळ नवीन कामांवरच खर्च केला असल्याचे त्यांनी सांगितले.  

पिंपरी-चिंचवड शहराच्या संपूर्ण भागात खोदाई केली आहे. अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरु आहेत. पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्ट टाकण्याचे काम सुरु आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. खासगी मोबाईल कंपन्याकडून विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी खोदाई केली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खोदाई केल्यानंतर खड्डे बुजविले गेले नाहीत. खड्डे व्यस्थितरित्या बुजविले जात नसून अर्धवट ठेवले जात आहेत. खड्ड्यांच्या सातत्याने तक्रारी येत आहे.

याबाबत बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले,  ”शहरात अनेक विकासकामे चालू आहेत. त्यासाठी खोदाई केली आहे. खड्ड्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आगामी तीन महिन्यात कोणतेही नवीन काम हाती घेतले जाणार नाही. सध्या चालू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे. कामे पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे”.

”मागील दोन वर्षात केवळ नवीन कामांवरच खर्च झाला आहे. च-होली, मोशी या भागात प्रशस्त नवीन रस्ते केले आहेत. दोन वर्ष रस्त्यांची कामे केली नाहीत. डांबरीकरण केले नाही. त्यामुळे चालू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन कामे हाती घेतली जाणार आहेत”, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.