Bhosari Crime News : फोर्कलिफ्ट अंगावर आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू 

एमपीसी न्यूज : कंपनीत ड्रेनेजच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोर्कलिफ्ट अंगावर आल्याने मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.8) भोसरी एम आय डी सी मधील कोरस इंडिया कंपनीत घडली. याप्रकरणी निष्काळजीपणे फोर्कलिफ्ट  चालवणाऱ्या चालकावर आणि कंपनी अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

समाधान नाना ननावरे ( वय 27, रा. दत्तनगर कॉलनी, दिघी ) असे या अपघातात मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी मयत कर्मचाऱ्याचा भाऊ आण्णा नाना ननावरे ( वय 38, रा. दत्तनगर कॉलनी, दिघी ) यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फोर्कलिफ्ट चालक गणपती वाघमारे आणि कंपनी अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत समाधान ननावरे हे कोरस इंडिया कंपनीत ड्रेनेज क्लिअर करण्याचे काम करत होते. त्यावेळी फोर्कलिफ्ट चालकाने निष्काळजीपणे फोर्कलिफ्ट चालवल्याने त्यांच्या अंगावर गेली या अपघातात समाधान यांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी न घेता अधिका-यांच्या हायगयीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास भोसरी एम आय डी सी चे पोलीस उपनिरीक्षक टोके करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.