Pimpri : तपासणी मोहिमेत 338 कर्मचारी आढळले दोषी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबरोबरच क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रशासन विभागाच्या वतीने अचानकपणे राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 338 कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यापैकी 25 जणांचे खुलासे समाधानकारक आहेत. तर, 12 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 21 कर्मचा-यांना मेमो, 50 कर्मचा-यां समज आणि 58 कर्मचा-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांना शिस्त लागावी. याकरिता प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 28 सप्टेंबर तसेच 1 ते 8 ऑक्‍टोबर या कालावधीत अचाकोपणे ही तपासनी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये कामाच्या वेळेत विनाकारण कॅन्टीनमध्ये जाणे, आयकार्ड न लावता कामावर येणे, कामाचे ठिकाण सोडून अन्यत्र रेंगाळणारे कर्मचारी आढळले. या सर्व कर्मचा-यांची  तत्काळ दखल घेत, विभागप्रमुखांना या कर्मचा-यांची यादी सोपविण्यात आली. तसेच, या सर्व कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

या तपासणी मोहिमेत नऊ दिवसांत एकूण 103 विभागांच्या कर्मचा-यांची अचानकपणे तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 338 कर्मचारी दोषी आढळले. या तपासणी मोहिमेनंतर या सर्व कर्मचा-यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. या कर्मचा-यांपैकी 25 जणांचे खुलासे समाधानकारक असल्याने, ते मान्य करण्यात आले आहेत. 12 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, 21 कर्मचा-यांना मेमो, 50 कर्मचा-यांना समज आणि  58 कर्मचा-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.