Pune: डिसेंबरपासून वेतन न मिळाल्यामुळे नवले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Employees of Navale Hospital go on strike due to non-receipt of salary since December in pune

एमपीसी न्यजू- डिसेंबर महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे पुण्यातील सिंहगड परिसरात असलेल्या नवले रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी आज (दि. 30) सकाळापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

विशेष म्हणजे, या रुग्णालयात 80 कोरोनाबाधितांवर उपचार होत आहेत. तर 60 जण आयसोलेशन वॉर्डात आहेत. कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

लॉकडाऊन काळात कामावर न आलेल्या सुमारे 200 जणांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. नेहमी केवळ आश्वासने दिली जातात. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरु केल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

रुग्णालयाच्या समोर मोठ्याप्रमाणात हे कर्मचारी जमा झाले आहेत. यामुळे रुग्णांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like