Pune : दिव्यांगांसाठी शुक्रवारी रोजगार मेळावा

एमपीसी न्यूज – सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून नीव फाऊंडेशन आणि कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी रोजगार मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील सोमवार पेठ, नागपती चौक, सिध्दीविनायक केसर, कार्यालय क्र. 818 येथे हा मेळावा शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. दहावी आणि बारावी झालेल्या अपंग, भाषण, श्रवणविषयक दुर्बलांसाठी हा मेळावा घेण्यात येत आहे.

या मेळाव्यात नामांकित कंपन्यांचा सहभाग असून इच्छुकांनी बायोडेटा, ओळख पुरावा, अपंगत्व प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे घेऊन जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नीव फाऊंडेशन आणि कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9766721627, 9890597745 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.