PCMC : आठवड्याला घरातील भांडी रिकामी करुन कोरडी करा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – डेंग्यू या रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी डास उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. त्याकरिता दर आठवड्याला घरातील पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यातील पाणी वापरुन भांडी रिकामी करुन कोरडी करावीत, असे आवाहन (Pcmc) महापालिकेने केले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 16 मे 2023 हा राष्ट्रीय डेग्यु दिन म्हणुन राज्यात सर्वत्र साजरा करण्याविषयी कळविण्यात आलेले आहे. महापालिकेच्या 8 झोनल रुग्णालय स्तरावर राष्ट्रीय डेंग्यु दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर (Pcmc) पिंपरी, कै.ह.भ.प मल्हाराव कुटे मेमोरिअल रुग्णालय, आकुर्डी, नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी, स्व. इंदिरा गांधी प्रसुतीगृह रुग्णालय, सांगवी, यमुनानगर रुग्णालय, यमुनानगर, नविन थेरगाव रुग्णालय, थेरगाव व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, चिंचवड या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांची बैठक, आशा स्वयंसेविका कार्यशाळा व रुग्णालयात आलेल्या रुग्णांना डेंग्यु आजाराविषयी माहिती व करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Aalandi : आळंदी शहराचा दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

घरात पाण्याची साठवण करतो तसेच घराभोवतीच्या परीसरात साठलेले सांडपाणी असे साठलेले पाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते. साठलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या वाढल्या तरी आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती विनासायास होते. डासांच्या अंडयापासुन त्याचा डास होण्यास 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो.

त्यासाठी दर आठवडयास साठलेले पाणी एकदा पूर्णपणे वापरुन ड्रम कोरडा केला, सुकवून नंतर परत भरला. तर, त्या पाण्यात असलेल्या पण नजरेस न दिसणा-या अंडी/अळ्या मारल्या जातील. तसेच घराभोवतीच्या साठलेल्या पाण्याची डबकी बुजविली किंवा साठलेले पाणी वाहते केले. तर, डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल.

घरातील पाण्याचे काही साठे असे पूर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. उदा. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा फ्लॅटच्या तळघरात असलेली साठलेले पाणी अशा ठिकाणी डासांनी अंडीच घालू नयेत म्हणुन या टाक्या पूर्णपणे झाकण टाकुन बंद ठेवाव्यात म्हणजे डास टाकीत शिरु शकणार नाहीत.

घरामध्ये आपल्याकडुन दुर्लक्षित असणारे साठलेले पाणी फ्लॉवर पॉट, कुलर, मनीप्लॅन्ट, घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी असते. दर आठवडयास या वस्तुतील पाणी बदलले गेले नाही तर डासांना अंडी घालण्यास उत्तम जागा मिळते.

पावसाळयात घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर आपण टाकलेल्या भंगार मालात पाणी साचते. हे पाणी फेकुन देण्याचे लक्षात येत नाही. पाऊस गेल्यावर उन्हामुळे या वस्तु आपोआप वाळतील अशा दृष्टिने आपण त्याकडे पाहातही नाही. पण, याच पाण्यात डासांची भरपुर वाढ होऊ शकते. डेंग्यु या रोगाचा प्रसार वाढु नये म्हणुन डास उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.

दर आठवड्याला घरातील पाणी साठविण्याच्या सर्व भांडयातील पाणी वापरुन भांडी रिकामी करुन कोरडी करावयाची आहेत. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावयाचे आहे. घरातील मोठया टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकन बसवायचे आहे. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रे मधील पाणी दर आठवडयास रिकामे करावयाचे आहे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे.

घराभोवतीच्या पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा सदर ठिकाणे पाणी वाहते केले जाईल. याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. स्वच्छता गृहाच्या व्हेंन्ट पाईपला जाळ्या बसविणे आवश्यक आहे. येणा-या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड महापालिका (Pcmc)  क्षेत्रात हिवताप, डेंग्यु व चिकुनगुन्या सारखे रोग पसरु नयेत म्हणुन वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.