Encounter News: पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पोलिसांसह सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई सुरू केली असून आणखी एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.

एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे जदुरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले तर एक जवान जखमी झाला. पोलीस आणि सुरक्षा दल एकत्रितपणे ही कारवाई करीत आहेत. पुलवामाच्या जदुरा भागात शनिवारी रात्री उशिरा चकमक सुरू झाली. आणखी एका दहशतवाद्याला पकडण्यासाठी सध्या या भागात लष्कराची शोध मोहीम सुरू आहे, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.

यापूर्वी, काश्मीरमध्ये पंचायतीच्या सदस्याला (पंच) ठार मारण्यासाठी जबाबदार असलेले दोन अतिरेकी हे शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी होते. किल्लूर भागात चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी अल बदर जिल्हा कमांडर शकूर रथार आणि त्याचे साथीदारही होते. किल्लूरमध्ये दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई सुरू केली होती आणि किल्लूर भागात घेराव घालण्यात आला होता. पहिल्या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले.

_MPC_DIR_MPU_II

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात शुक्रवारी पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणास घेरले. पोलिसांनी सांगितले की, अवंतीपोरा येथील टाकिया गुलाबबाग त्राल भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची खात्रीशीर माहितीच्या आधारे सैन्य आणि सीआरपीएफने या भागात शोध मोहीम राबविली.

पोलिसांनी सांगितले की, “त्या भागात शोधाशोध सुरू असताना दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका तळ आढळून आला.  तो नष्ट करण्यात आला आहे. संयुक्त पथकाला घटनास्थळावरून दारूगोळाही सापडला होता, जो तपासाच्या उद्देशाने पकडला गेला असून तो ताब्यात घेण्यात आला आहे. संबंधित कलमांखाली  एफआयआर नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.