BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘एनकाउंटर माणसांचे नको, पुरुषसत्ताक पद्धतीचे झाले पाहिजे’

स्वाक्षरी अभियानादरम्यान नागरिकांचे मत

एमपीसी न्यूज – हैद्राबादमधील घटनेच्या पार्श्वभूमीर ‘वर्क फॉर इक्वालिटी’ या सामाजिक संस्थेने आज (रविवारी) स्वाक्षरी अभियान राबविले. ‘एनकाउंटर माणसांचे नको,  पुरुषसत्ताक पद्धतीचे झाले पाहिजे’ असे परखड मत अनेक सजग नागरिकांनी स्वाक्षरी अभियानादरम्यान व्यक्त केले.

वर्क फॉर इक्वालिटी’ या सामाजिक संस्थेने आज (रविवारी) घोरावडेश्वर डोंगरावर स्वाक्षरी अभियान राबविले. ‘माणूस नको स्त्रियांना वस्तू समजणे ही मानसिकता बदलली पाहिजे’, ‘एनकाउंटर माणसांचे नको-  पुरुषसत्ताक  पद्धतीचा केला पाहिजे’ या बॅनरखाली स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

हैद्राबादच्या बलात्कार व एनकाउंटर नंतर मोठ्या प्रमाणावर समाजातून विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्याययंत्रणेला बगल देऊन कायदा हातात घेणे हे कोणत्याही प्रश्नावरचे कायमस्वरूपाचे उत्तर असू शकत नाही. तर, स्त्रियांना दुय्यम समजणारी, वस्तू समजणारी पुरुषसत्ताक पद्धतीचा समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असे मत या अभियानाला पाठिंबा देणाऱ्या  युवक, पुरुषांनी व्यक्त केले. तर, स्त्रियांवरील अन्याय पूर्णपणे थांबवायचे असतील. तर, कायदयाच्या कडक अंमलबजावणीची गरज आहे, असेही बोलून दाखविले.

स्त्रियांवर होणाऱ्या कोणत्याही स्वरूपाचा अन्याय मग तो बलात्कार असो किंवा स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, अॅसिड फेकणे, बाल लैंगिक शोषण अशा सर्व प्रकारच्या घटनांसाठी ‘फास्टट्रॅक कोर्ट’ तालुक्याच्या ठिकाणी असावेत. त्यांची संख्या वाढवावी. न्याय यंत्रणेने 24 तास सेवा दिल्यास अनेक खटले निकाली लवकर लागू शकतात, अशी भूमिका काही नागरिकांनी मांडली.

एनकाऊंटर गरिबांचा, दलितांचा, आदिवासींचा ज्यांच्या हातात सत्ता नाही. अशांचा होण्याची जास्त शक्यता आहे. पण, अनेक पांढरपेशे ज्यांच्यावर स्त्रियांच्या लैगिंक शोषणाच्या केसेस झालेल्या असताना देखील, ते सर्वाना माहीत असताना देखील त्यांच्यावर कोणीही कारवाई का करीत नाही? त्यामुळे कायदा हातात घेणे म्हणजे जंगल राज आल्यासारखेच आहे, अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या.

वर्क फॉर इक्वालिटी संस्थेच्या संस्थापक प्रभा विलास म्हणाल्या, ”ज्या लोकांनी एनकाउंटरचा जल्लोष केला. ती एक प्राथमिक प्रतिक्रिया होती. पण खऱ्या अर्थाने लोकांचा उद्वेष हा लवकर न्याय मिळत नाही. यासाठी आहे. लवकर न्याय मिळतो हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाल्यास लोक शस्त्र हाती घेणार नाहीत. अन्यायग्रस्तांनाही जरब बसेल. बलात्कारी हा एका रात्रीत तयार होत नाही. तर, बलात्कार करणे ही एक प्रवृत्ती असून ही प्रवृत्ती कुटुंबात व समाजात रोज यांना जी असमानतेची वागणूक दिली जाते ते पाहून तयार होते”.

”जर घराघरातूनच मुलांना मुलींचा व स्त्रियांचा सन्मान होतो हे बघायला व अनुभवायला मिळाले. तर,  बलात्कारासारखे अमानवीय कृत्य घडणार नाहीत. यासाठी पुरुषसत्ताक पद्धतीवर आपण सर्वांनी मिळून घाव घातले पाहिजे, ती समूळ नष्ट केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3