Eng Vs Irl ODI : कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामनाही इंग्लंडने जिंकला

England also won the first ODI after the Test series :आयर्लंडकडून पदार्पणाचा सामना खेळणारा कर्टीस कॅम्फर याने एक बाजू लावून धरत दमदार खेळी केली.

0

एमपीसी न्यूज – कोरोनानंतर इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली कसोटी मालिका पार पडल्यानंतर 30 जुलैला सुमारे साडेचार महिन्यांनी वन डे सामनादेखील खेळविण्यात आला. इंग्लंडने पहिल्या या वन डे सामन्यात आयर्लंडवर 6 गडी राखून विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिज बरोबर कसोटी मालिका इंग्लंडने 2-1 अशी जिंकल्यानंतर आयर्लंड बरोबर झालेला पहिला एकदिवसीय सामना देखील इंग्लंडने जिंकला आहे.

इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत आयर्लंडचा डाव 173 धावांत संपवला. इंग्लंडच्या डेव्हिड विलीने आयर्लंडला चांगलाच दणका देत 30 धावांत 5 बळी घेतले.

174 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 6 गडी राखून सामना जिंकला. इंग्लंडकडून जेसन रॉय (24) आणि जेम्स विन्स (25) चांगली सुरूवात मिळाल्यानंतर बाद झाले.

त्यानंतर सॅम बिलिंग्सने नाबाद अर्धशतक (67) ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने 27.5 षटकात सामना जिंकला.

*आयर्लंडच्या कर्टीसची दमदार खेळी

आयर्लंडकडून पदार्पणाचा सामना खेळणारा कर्टीस कॅम्फर याने एक बाजू लावून धरत दमदार खेळी केली. त्याने 4 चौकारांसह नाबाद 59 धावा केल्या.

तसेच इंग्लंडच्या डावात त्याने 5 षटकं टाकून 1 बळी टिपला. त्यामुळे आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक आणि किमान एक गडी मिळवणे अशी दुहेरी कामगिरी करणारा तो केवळ 17 वा खेळाडू ठरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like