Eng Vs Pak: पाकिस्तान विरुद्धची पहिली कसोटी इंग्लंडने तीन गडी राखून जिंकली

Eng Vs Pak: England won the first Test against Pakistan by three wickets पाकिस्तानकडून यासिर खानने सर्वाधिक 4 गडी बाद कले. त्यानंतर यासिर शाह ब्रॉड 7 धावांवर बाद केले. क्रिस वोक्स 84 धावांवर नाबाद राहत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

एमपीसी न्यूज – पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात धमाकेदार कामगिरी करणारा पाक संघ दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडच्या क्रिस वोक्स (नाबाद 84) आणि जोस बटलर (75) यांच्या सहाव्या विकेटसाठी केलेल्या 139 धावांच्या जीवावर इंग्लंड ने हा सामना तीन गडी राखून जिंकला.

पहिल्या कसोटी सामन्यात सुरुवातीला बॅकफूटवर असलेल्या यजमान इंग्लंडने पाकिस्तानला एक दिवस आणि 3 गडी राखून पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 8 बाद 138 धावांवरुन यासिर शाह 15 आणि मोहम्मद अब्बास 0 या जोडीने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.

पाकच्या धावफलकावर 158 धावा असताना द्रॉने यासिरला 33 धावांवर चालते केले. नसीम शाहला बाद करत जोफ्रा आर्चरने पाकिस्तानचा दुसरा डाव 169 धावांत आटोपला.

इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात विजयासाठी 277 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. सॉरी बन्ना (10) आणि डॉमिनिक सिब्ले (36) धावा करुन बाद झाले. ही जोडी माघारी फिरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघावरील दबाव कमी केला.

बेन स्टोक्स (9) ओली पौप (7) थावा करुन माघारी फिरल्यानंतर जोस बटलर आणि क्रिस वोक्सने सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी अर्धशतक पूर्ण करत शतकी भागीदारीसह संघाला विजयी पथावर आणले. या दोघांनी 139 धावांची बहुमूल्य खेळी केली.

ही जोडगोळी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार असे वाटत असताना यासिर शाहने जोस बटलरच्या रुपात इंग्लंडला सहावा धक्का दिला. बटलरने 75 धावांची खेळी केली.

पाकिस्तानकडून यासिर खानने सर्वाधिक 4 गडी बाद कले. त्यानंतर यासिर शाहने ब्रॉड 7 धावांवर बाद केले. क्रिस वोक्स 84 धावांवर नाबाद राहत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.