Eng vs WI Test Series: जोफ्रा आर्चरला तिसरी कसोटी खेळण्यासाठी परवानगी

Eng vs WI Test Series: Jofra Archer allowed to play third Test सक्त ताकीद दिल्यानंतरही जोफ्रा आर्चर मँचेस्टरदरम्यान आपल्या घरी गेला होता. याप्रकरणी बोर्डाने आर्चरला दंड ठोठावला होता.

एमपीसी न्यूज – जोफ्रा आर्चरने बायो सुरक्षेचा नियम तोडल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला बाहेर काढण्यात आले होते. आर्थिक दंड आणि सक्त ताकीद दिल्यानंतर आर्चरला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पहिल्या सामन्यानंतर प्रवासादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने विशेष कारची सोय करुन दिली होती. प्रवासादरम्यान खेळाडूंना कुठेही न थांबण्याच्या सूचना देऊन त्यांच्यासाठी विशेष पेट्रोल पंप आणि जेवणासाठी बायो सुरक्षित मैदानाची सोय करण्यात आली होती.

मात्र, सक्त ताकीद दिल्यानंतरही जोफ्रा आर्चर मँचेस्टरदरम्यान आपल्या घरी गेला होता. याप्रकरणी बोर्डाने आर्चरला दंड ठोठावला होता. तसेच त्याला तातडीने क्वारंटाइन होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

आर्चरने आपली चूक मान्य करत अशी चूक पुन्हा होणार नाही याची खात्री दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरला तब्बल 30,000 पाऊंडचा दंड ठोठावला आहे. त्याने लिखीत हमी दिल्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

साऊदम्पटन कसोटी सामना गमावल्यानंतर इंग्लंडकडे मँचेस्टर कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची संधी होती. परंतु, तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.