Pimpri : पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट; तीन कामगार जखमी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट झाला. यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी घडली.

हिरामण आल्हाट, मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी कर्मचारी पिंपरीतील पीएमपीच्या बसडेपोत बस दुरुस्तीचे काम करत होते. दरम्यान, बसचा अचानक रेस वाढून इंजिनचा स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगार जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ इजा असल्याने उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी भोसरी, नतावाडी या डेपोतही घडल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.