Hinjawadi : बांधकाम साईटवर ट्रॉली’ अंगावर पडल्याने अभियंत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करत असताना लोखंडी ‘ट्रॉली’ अंगावर पडल्याने अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोयतेवस्ती, पुनावळे येथील जी.के. बिल्डर्स यांच्या बांधकाम साईटवर घडली.

सागर ईश्वर पाटील (वय 26, रा. चाळीसगाव, जळगाव), असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ईश्वर महादू पाटील (वय 58) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जी.के.डेव्हलपर्सचे उत्तम नरळे, सेफ्टी सुपरवायजर सागर चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर हे पुनावळे येथील जीके डेव्हलपर्स या बांधकाम साईटवर काम करत होते. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दहाव्या मजल्यावरून लोखंडी ट्रॉली त्यांच्या अंगावर पडली. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.