Engineer Farhan : नागफणीच्या दरीत अखेर चार दिवसांनी सापडला अभियंता फरहानचा मृतदेह

एमपीसी न्यूज : दिल्ली येथील एक अभियंता (Engineer Farhan) लोणावळ्यात गिरीभ्रमंतीसाठी आला असता, ड्युक्स नोज परिसरातून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. आयएनएस शिवाजीच्या पथकाला हा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले.

फरहान अहमद (वय 24, रा. दिल्ली) हा युवक शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता झाला असून, सलग चार दिवस त्याचा विविध पद्धतीने शोध सुरु होता. मात्र, तो मिळून न आल्याने त्याल शोधून देणार्‍याला 1 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते.

फरहान अहमद (Engineer Farhan) हा दिल्ली येथील अभियंता काही शासकीय कामासाठी कोल्हापूरला गेला होता. एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत तो काम करतो. त्याला गिर्यारोहणाची आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर तो लोणावळ्यात आला होता. शुक्रवारी ड्युक्स या ठिकाणी तो फिरायला गेला असताना, त्याला आपण रस्ता चुकलो असून भरकटल्याचे समजल्यानंतर त्याने भावाला फोन करून रस्ता चुकल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळात त्याचा मोबाईल बंद झाला होता.

Nagphani : नागफणीमध्ये आढळला मृतदेह; दिल्लीतील बेपत्ता तरुण असल्याची शंका!

त्याच्या भावाने काही मित्रांच्या मदतीने लोणावळा पोलिसांशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दोनपासून तो गायब आहे. ही माहिती समजल्यानंतर लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवदुर्ग मित्र या बचाव पथकातील स्वंयसेवक, वन्यजीव रक्षक समिती मावळ या पथकातील स्वंयसेवक, खोपोली येथील यशवंती हायकर्स सदस्य व कुरवंडे गावातील तरुण शोध घेत होती.

Engineer Farhan
Engineer Farhan

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा – https://youtube.com/shorts/8BTQOB9zdCk?feature=share

आज सकाळी आयएनएस शिवाजीचे जवान व एनडीआरएफची टिम शोधार्थ दाखल झाली होती. यापैकी आयएनएस शिवाजी पथकाला सदरची बाॅडी निदर्शनास आली. यानंतर शिवदुर्गचे पथक, पोलीस व अन्य समित्यांचे कार्यकर्ते दरीत खाली उतरत त्यांनी सदर मृतदेहाची ओळख पटवत तो मृतदेह रेल्वे बोगदा भागातून वर काढण्याचे काम सुरु आहे.

दोन दिवस पोलिसांनी श्वान पथकाद्वारे देखील शोध मोहिम राबवली. उंच डोंगर व दर्‍या त्यामध्ये घनदाट झाडी असा हा परिसर असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत असल्यातरी सर्व पथके चार दिवस सातत्यपूर्ण प्रयत्न करत होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.