Engineering Admission : अभियांत्रिकी प्रवेशांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ, फर्स्ट ईअर 1 डिसेंबरपासून

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरू होणार तर, 30 नोव्हेंबपर्यंत प्रवेशासाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने 13 ऑगस्टला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला आणि अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्षांपासून पुढील वर्ग 16 ऑगस्टपासून तर नव्या विद्यार्थ्यांचे वर्ग 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार होते.

पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे निकाल कोरोना संसर्गामुळे जाहीर होण्यात अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्याबाबत एआयसीटीईने महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांना 31 डिसेंबपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता अभियांत्रिकीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे.

परिषदेने अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची मुदत 30 नोव्हेंबर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम वर्षांचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.