Pune : राजगडाच्या बालेकिल्ल्यावर अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू 

एमपीसी न्यूज – राजगडाच्या अति दुर्गम बालेकिल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या विकास बिरुदेव गावडे ( वय 45, राहणार, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या अभियंत्याचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मुत्यू झाला.

ही घटना आज गुरुवारी ( 16 ) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजगडाच्या अति दुर्गम बालेकिल्ल्याच्या दरवाजात घडली.
अति दुर्गम बालेकिल्ल्यावर खडकातील पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथ-यावर कोसळले. ते तेथेच पडले होते. मात्र, अर्धा पाऊण तासाने त्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मुत्यू झाला, अशी माहिती वेल्हा येथील सरकारी रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोरसे यांनी दिली आहे.
मयत विकास गावडे हे वाळवा तालुका इंजिनिअर असोनिएशनचे अध्यक्ष आहेत.

विकास गावडे यांच्यासमवेत इस्लामपूर येथील 35 जण आज सकाळी राजगडावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लोखंडी शिडीवर त्यांना ठेवून खाली आणले. घटनेची माहिती मिळताच वेल्हा पोलीस ठाण्याचे अभय साळुंखे, राजगड पोलीस ठाण्याचे गणेश लडकत यांनी गुंजवणे, पाल येथील होमगार्ड, कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. सरकारी रुग्ण वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या पोलीस पथकाने सरकारी रुग्णवाहिकेतून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्रि भोर येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी वेल्हा पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like