ENG Won Test Series: इंग्लंडची विंडीज वर 269 धावांनी मात, मालिका 2-1 ने जिंकली

England beat West Indies by 269 runs to win third Test and series पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या यजमान इंग्लंडने विंडीजला तब्बल 269 धावांनी पराभूत करत 32 वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले.

एमपीसी न्यूज – इंग्लंड संघाने तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाहुण्या विंडीज समोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचा संघ वोक्स अन ब्रॉड यांच्या माऱ्यासमोर पुन्हा गडबडला, चौथ्या दिवसाचा खेळ पावसाने वाया घालवल्यानंतर पाचव्या दिवशीही मॅचेस्टरच्या मैदानात पावसाच्या सरी इंग्लंडच्या मालिका विजयात अडथळा ठरतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण विंडीजला चौथ्या दिवशीप्रमाणे पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसाने साथ दिली नाही.

इंग्लंड गोलंदाजांनी विंडीज संघाला 129 धावांत आटोपत मालिका 2-1 अशी खिशात घातली. ब्रॉडने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात विंडीजच्या 4 गड्यांना बाद केले.

पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या यजमान इंग्लंडने विंडीजला तब्बल 269 धावांनी पराभूत करत 32 वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले.

विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. ब्रॉडने सुरुवातीलाच दोन धक्के देत विंडीजच्या पराभवाचे चित्र गडद केले. विंडीजच्या दुसऱ्या डावात कॅम्पवेल (0) आणि केमार रौच (4) यांना तंबूचा रस्ता दाखवत ब्रॉडने तिसऱ्या दिवसाअखेरच्या खेळापर्यंत दोन्ही डावात मिळून 8 बळी टिपले.

पहिल्या डावात त्याने अवघ्या 45 चेंडूत 62 धावांची धमाकेदार खेळी केली होती. विंडीजच्या दुसऱ्या डावात शाय होपने केलेली 31 धावांची संघातील सर्वोच्च खेळी ठरली.

ब्लॅकवूड (23), ब्रूक्स (22), ब्रेथवेट (19) आणि कर्णधार जेसन होल्डर (12) यांच्याव्यतिरिक्त एकाही कॅरेबियन खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. विंडीजच्या दुसऱ्या डावात क्रिस वोक्सने सर्वाधिक 5 बळी टिपले तर ब्रॉडने 4 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. डॉम बेसन रोस्टन चेस धावबाद केले.

तिसऱ्या कसोटी सामन्यात ब्रॉड धमाका पाहायला मिळाला. पहिल्या डावात फलंदाजीने लक्ष वेधून घेतलेल्या या त्याने चेंडू हातात आल्यावर गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने पहिल्या डावात 6 बळी टिपले. जेम्स अँडरसन 2 आणि आर्चर- वोक्स यांनी प्रत्येकी 1-1 बळी मिळवत त्याला उत्तम साथ दिली.

विंडीजकडून कर्णधार जेसन होल्डर (46), डावरिच (37) कैम्पबेल (32), ब्लॅकवूड (26) आणि कॉर्नवेल (10) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही गड्याला पहिल्या डावात दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे विंडीजचा पहिला डाव अवघ्या 197 धावांतच आटोपला होता.

इंग्लंडने 172 धावांच्या आघाडीसह आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. बन्न्स-सिब्ले जोडीनं पहिल्या विकेटसाठी 14 धावांची भागीदारी रचत इंग्लंडला दमदार सुरुवात करुन दिली. सिब्ले 56 धावा करुन माघारी फिरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट मैदानात आला.

त्याने सलामीवीर बन्नाच्या साथीने इंग्लंडची आघाडी आणखी भक्कम केली. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या बन्न्सला रोस्टन चेस तंबूचा रस्ता दाखवला. तो 90 धावांवर बाद होताच कर्णधाराने इंग्लंडचा डाव 2 बाद 226 धावांवर घोषित केले. यावेळी जो रुट 68 धावांवर नाबाद खेळत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.