Match Betting: इंग्लंड विरुद्ध भारत सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, लोणावळा पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज : इंग्लड विरुद्ध भारत यांच्यात रविवारी (दि.17) सुरु असणाऱ्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना लोणावळा ग्रामिण पोलिसांनी अटक केली आहे. (Match Betting) ही कारवाई आपटी गावातील लेक मेन्शन या नावाच्या बंगल्यावर करण्यात आली.

 

 

अजय नटवरलाल मिठीया (वय 47 रा.मुळचा राजकोट गुजरात) व रवि रसिकभाई रजाणी (वय 26 रा.राजकोट, गुजरात)  व त्यांचे दोन साथीदार अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

Pimpri News: नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्याजवळील आपटी गावाच्या हद्दीत आरोपी हे रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यावर बुकीच्या सहाय्याने सट्टा लावत होते.(Match betting) यावेळी ते कमलेश, धिरू,गोकुळ, हरी, मयुर, शैलेश, विमल (पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्या सहाय्याने मोबाईल व लॅपटॉप वरून सट्टा लावत होते. पोलिसांनी तेथे छापा मारून त्यांच्या जवळून सट्ट्याचे सामान व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 88 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.