Pune : गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याचा आनंद घ्या – पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज – कोणीही अनुचित प्रकार करू नये यासाठी न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मिरवणुकीत सहभागी व्हावे ; न्यायालयीन लढाई न्यायालयीन लढावी लागते. बहिष्कार टाकलेल्या मंडळांना पालकमंत्री गिरीश बापट यांंनी पत्रकार परिषदेमध्ये विनंती केली.

मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाचं विरोधात पुण्यातील गणेश मंडळांनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणपतीची मूर्ती मांडवातच ठेवण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आहे, पाश्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांंनी पत्रकार परिषद घेतली

यावेळ बापट म्हणाले, गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याचा आनंद घ्या, न्यायालयाचा निर्णय हा सणा करीता नसतो तर नागरिकांसाठी असतो. सर्व धर्मीय सण साजरे करताना न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करावा.माझं कोणाशी बोलणं झालं नाही झालं तर मी त्या मंडळांना समजावून सांगेल. ( विसर्जन मिरवणूक बहिष्कार मंडळावर ) जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना खर्च त्रास होतो त्यामुळे नागरिकांना त्रास होईल असं कोणी करू नये. दहीहंडी आणि मोहरम च्या वेळेस सुद्धा हाच आग्रह असेल, असे बापट म्हणाले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, सर्वाना बरोबर घेऊन सर्व बैठका शांततेत पार पडल्या. तसेच शांततेत विसर्जन पार पाडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय याचे उल्लंघन कोणी करू नये. जशी प्लास्टिक बंदी करण्यात आली तसेच हे ही लोकांच्या हितासाठी आहे. कोणत्याही व्यवसायिकांच्या विरोधात आम्ही नाही. शांततेत मिरवणूक पार पडावी अशी सर्वाना विनंती यावेळी महापौर यांनी केली. कोणत्याही मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, पोलिसांना कोणत्याही बलाचा वापर न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.