Entertainment News : क्रिकेटर इरफान पठाण पाठोपाठ फिरकीपट्टू हरभजन सिंहचीही चित्रपटात एन्ट्री

एमपीसी न्यूज – भारताचा अष्टपैलू खेळाडू पैकी एक इरफान पठाण ‘कोब्रा’ नावाच्या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पठाण पाठोपाठ आता फिरकीपट्टू हरभजन सिंहनेही चित्रपटात एन्ट्री केली आहे. त्याच्या ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला.

यापूर्वी बऱ्याच खेळाडूनी चित्रपटसृष्टीमध्ये आपले नशीब अजमावले आहे. आता इरफान पठाण आणि हरभजन सिंह रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 35 व्या वर्षीय इरफान पठाणने क्रिकेटला गुडबाय केला होता. इरफानने टीम इंडियाकडून शेवटचा सामना 8 वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2012 मध्ये खेळला होता. कोलंबोमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना इरफानचा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही.

हरभजन सिंहने त्याचा पहिलावहिला तमिळ चित्रपट ‘फ्रेंडशिप’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये हरभजनचा अनोखा अंदाज पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. तसेच सोशल मीडियावर हरभजनच्या अभिनयची प्रशंसा केली जात आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन सीन्सचा भरणा असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

हरभजन सिंहने 25 मार्च 1998 ला कसोटीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं तर, 17 एप्रिल 1998 ला त्यानं एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं. 25 ऑक्टोबरला त्यानं शेपवटचा एकदिवसीय सामना खेळला. कसोटीत त्याच्या नावावर 417 बळी आहेत तर, एकदिवसीय सामन्यात 269 बळी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.