Entertainment News : ललित प्रभाकर, सई ताम्हणकर बनले शेफ; चित्रपटासाठी घेतले प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकृतीमधून काहीतरी वेगऴे देणारे तरुण आणि बहुआयामी कलाकार म्हणजे ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर. ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात ललितने ‘निस्सीम’ तर सईने ‘गौरी’ ही भूमिका साकारली आहे आणि ते दोघेही एका मोठ्या हॅाटेलात शेफ आहेत.आपल्या अभिनयातून प्रत्येक भूमिकेला एक वेगऴा आयाम देण्याचा प्रयत्न करणार्या या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे.

 

शेफची भूमिका मोठ्या पडद्यावर अगदी वास्तवदर्शी दिसण्यासाठी ललित आणि सईने बराच काळ एका हॅाटेलात स्वत: काम केले अणि कामाच्या विविध गोष्टी,देहबोली व भावमुद्रा समजून घेतल्या. या भूमिकेतील बारकावे दर्शविण्यासाठी कटींग,सिजनिंग,चॅापिंग,कुकींग अशा विविध गोष्टी शिकून घेतल्या आणि किचनमध्ये कामसुध्दा केले.

 

या दोघांच्या मेहनतीची झलक दाखविणारे व्हिडीओज् चित्रपटाच्या टिमने प्रेक्षकांसाठी सोशल मिडीयावर आणले आहेत.
विधि कासलीवाल निर्मित इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर,ललित प्रभाकर,पर्ण पेठे, सागर देशमुख,नेहा जोशी,पुष्पराज चिरपुटकर,इप्शिता यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुऴकर्णी आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 17 जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.