Entertainment News : मनोरंजन विश्वातील दोन जोड्या विवाहबंधनात

एमपीसी न्यूज : रविवारी (दि. 24) बॉलीवूड अभिनेता वरूण धवन व फॅशन डिझायनर नताशा दलाल आणि मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर हे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यामुळे यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

अभिनेता वरूण धवन आणि नताशाने अलिबाग येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे तर सिद्धार्थ आणि मितालीने पुण्यातील ‘ढेपेवाडा’ येथे पारंपारिक पद्धतीने लग्न केले. वरुण आणि नताशाने ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली असून सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नात मात्र तारकांची वर्दळ दिसत होती.

धवन कुटुंबातील हे शेवटचे लग्न असल्याचे वरूणच्या काकांनी यावेळेस सांगितले. वरूण आणि नताशाच्या लग्नासाठी करण जोहर, मनिष मल्होत्रा असे ठराविक लोकचं दिसून आले तर सिद्धार्थ-मितालीच्या लग्नासाठी सई ताम्हणकर, सखी गोखले, गायत्री दातार, रश्मी अनपट, रीशी सक्सेना, ईशा केसकर, उमेश कामत, अभिशेक देशमुख, अभिज्ञा भावे, शिवानी रांगोळे आणि बऱ्याच कलाकारांची उपस्थिती बघायला मिळाली.

वरूण-नताशा 2 फेब्रुवारीला रिसेप्शन देणार असून तेव्हा बॉलीवूडमधील त्याचे सह-कलाकार, मित्र आदींना बोलावण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.