Vadgaon Maval : रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलचा ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील  रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. हा मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन माध्यमातून पार पडला. सन 1997-98 या शैक्षणिक वर्षीच्या इयत्ता दहावीचे विद्यार्थी यानिमित्ताने 22 वर्षानंतर ऑनलाईन एकत्र आले. सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कोरोनाच्या संकटातही आॅनलाईन गेट टुगेदर करत एकमेकांना या कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रेरणा दिली. 

वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमधील या विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधला. या माध्यमातून स्नेहमेळाव्यासाठी एकत्र येण्याची सर्वांची इच्छा होती. परंतु सद्य परिस्थितीत सुरू असलेले कोरोनाचे महासंकट व एकत्रित येण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत यामुळे ते शक्य नव्हते.

या संकटातच ख-या अर्थाने एकमेकांना आधार, प्रेरणा देण्याची गरज आहे, हे  ओळखून या माजी विद्यार्थ्यांनी आॅनलाईन गेट टुगेदर करण्याचा निश्चय केला.

त्यानुसार सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी रविवारी गुगल मीट अॅपच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने एकत्र आले व सर्वांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस करीत कोरोनाकाळात घ्यावयाची खबरदारी, उपाययोजना शेअर करीत प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितला व एकमेकांना धीर दिला. तसेच शाळेबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल, शाळेतील सर्व आठवणी सांगितल्या, लॉकडाऊनचा काळ हाटल्यावर 1998 च्या ब्याचच्या वतीने शाळेत वृक्षारोपण, समाजोपयोगी कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले.

करोनाच्या काळात सध्या लॉक डाऊन  कडक असल्यामुळे सर्व घरातच असतात व घरी टीव्ही व मोबाईल बघून कंटाळून गेले आहेत, याच पार्श्वभूमीवर या बॅचच्या मुला-मुलींचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार झाला व त्यातून ऑनलाईन गेट-टुगेदर करायची कल्पना करून तब्बल बावीस वर्षांनी सर्व एकत्र आले. सर्वांनी एकमेकांना या कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले, गुगल मीट ॲप वरून सर्व कार्यक्रम आयोजित केला, यामध्ये शाळेच्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ दाखवण्यात आले तसेच ऑनलाइन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कविता जोक्स व इतर अनुभव कथन केले, कोरोनाच्या या काळात ऑनलाईन गेट-टुगेदर चा एक वेगळा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला.

याचे नियोजन सारिका बागेवाडी, सुजाता वेदपाठक, ज्योती भांबरे,स्वाती जाधव, वर्षा काळे, तुषार वहिले,नितीन कुडे,सुहास विनोदे आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.