Pimpri News : उद्योजिका आशा काकडे शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी

एमपीसी न्यूज – उद्योजिका आशा काकडे यांची पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पिंंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा  गिरीजा कुदळे यांनी त्यांची नियुक्ती केली. 

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचीन साठे, काँग्रेस पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनावणे आदि उपस्थित होते.

देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. केंद्रातील सत्ताधारी डोळे झाकून बसले आहेत. महिलांच्या संरक्षणाचा प्रश्‍न अत्यंत जटील झाला असून, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याची प्रतिक्रीया आशा काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.