MIDC : प्रस्तावित वाढीव वीज दराविरोधात शुक्रवारी उद्योजकांचा मोर्चा

एमपीसी न्यूज – प्रस्तावित वाढीव वीज दराविरोधात उद्योजकांचा मोर्चा 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कार्यालय भोसरी एमआयडीसी पावर हाउस येथे (MIDC) काढण्यात येणार आहे. मोर्चा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी ही माहिती दिली.

या मोर्चामध्ये इतरही औद्योगिक संघटना सहभागी होणार असून, महाराष्ट्रात वीज दरवाढीमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. त्यात विजेचा लपंडावामुळे वीज मोठ्या प्रमाणात जात असून आणि येत्या काळामध्ये प्रस्तावित वीज दरामध्ये दर वाढ होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. सध्याचा वीजदर सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात असून त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे मत आहे. जर अशीच दरवाढ राज्यात होत असेल तर राज्यातून कारखाने परराज्यात जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

 

Punawale : पुनावळे तून 44 लाखांचा गुटखा जप्त

सरकारने विजेची दरवाढ करू नये आणि आहे ते वीजेचे दर कमी करावेत, या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर उद्योजक मोर्चा काढणार आहेत. (MIDC) या मोर्चामध्ये सर्व उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा समाविष्ट होण्याचे आवाहन फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष भोर यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.