Thergaon News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज : – चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी  उपाध्यक्षा खुशबु प्रशांत दिघे व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिघे, यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.(Thergaon News) त्यांच्या 250 समर्थकांनीही यावेळी प्रवेश केला. शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे स्वागत केले.

थेरगाव येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख  बाळासाहेब वाल्हेकर ,युवासेना अधिकारी  विश्वजित बारणे, , शहरप्रमुख निलेश तरस ,शहर  संघटिका सरिता साने ,पिंपरी विधानसभा संघटिका शैला निकम ,देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे , दिलीप कुसाळकर सुनील पालकर ,दत्ता भालेराव व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Pimpri-Chinchwad : कत्तलीसाठी जनावरे पळवणाऱ्या मुंबईच्या टोळीवर मोक्का

प्रशांत दिघे, खुशबु प्रशांत दिघे यांच्यासह शुभम पाटील, संतोष चव्हाण, शारूख शेख ,ऋषिकेश बोरूडे, अभिषेक काळे, अजय कांबळे, सुभोद गायकवाड,अक्षय गायकवाड, पुजा काळे , मंगला काळे व इतर महिला बचत गट , मीना धोत्रे , शोभा गाडवे, सविता गायकवाड , शिला म्हासाळ अशा सुमारे 250 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यानेच शिवसेनेत कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. माजी नगरसेवक देखील पक्षात येत आहेत.(Thergaon News) शहरात शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणार आहे.

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share