Epfo Aadhaar Link : PF खातं त्वरित आधार कार्डशी लिंक करा, अन्यथा होऊ शकते नुकसान
एमपीसी न्यूज – कर्मचारी भविष्य निधी संस्थेने (EPFO) प्रॉव्हिडेंट फंड बाबत मोठा पाऊल उचलले आहे. पीएफ खात्यासाठी 01 जून 2021 पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. नवीन नियमांतर्गत एंप्लॉयरला तुमच्या खात्याला आधार व्हेरिफाय करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. असे करण्यास अयशस्वी झाल्यास एप्लॉयरकडून खात्यात जमा होणारे योगदान रोखले जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी आधार लिंक करणे गरजेचे आहे.
EPFO ने सोशल सिक्युरिटी कोड 2020 च्या कलम 142 अंतर्गत नवीन नियम आणला आहे. EPFO ने एंप्लॉयरला निर्देश दिले आहेत की एक जूननंतर पीएफ खात्याशी आधार लिंक न केल्यास इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (ईसीआर) भरले जाणार नाही. यामुळे पीएफ खातेधारकाच्या खात्यात एंप्लॉयरकडून दिले जाणारे योगदान देखील रोखले जाऊ शकते. त्यामुळे तुमचे खाते आधारसोबत लिंक असणे गरजेचे आहे.
असे करा आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक
– ईपीएफओच्या वैबसाइट वर लॉग इन करा – iwu.epfindia.gov.in/eKYC/
– यूएएन आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा
– ‘जनरेट ओटीपी’ पर्यायावर क्लिक करा
– ओटीपी प्रविष्ट करा आणि लिंग निवडा
– आपला आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा आणि ‘आधार पडताळणीची पद्धत’ निवडा
– ‘मोबाइल वापरा किंवा ईमेल आधारित सत्यापन वापरा’ पर्याय निवडा
– आपल्या मोबाइल नंबरवर आणखी एक ओटीपी येईल
– तो ओटीपी प्रविष्ट करा आणि आपली ईपीएफ, यूएएन आधार सीडींग प्रक्रिया पूर्ण करा
मासिक ईसीआर केवळ त्या सदस्यांसाठीच भरण्याची परवानगी दिली जाईल, ज्यांचे आधार क्रमांक यूएएनसह लिंक आहेत आणि एक जूनपासून सत्यापित आहेत. ईपीएफओ च्या अखंडित सेवा मिळविण्यास आणि कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांना आधार देणार्या सर्व सदस्यांच्या बाबतीत आधार तयार केला पाहिजे याची खात्री करुन घ्यावी. कर्मचारी पोर्टल आणि उमंग ॲपवर उपलब्ध ऑनलाइन ई-केवायसी सुविधेद्वारे कर्मचारी त्यांचे आधार थेट किंवा त्यांच्या मालकाद्वारे लिंक करू शकतात.