Pune Nashik Highway : बाह्यवळण, रिंगरोड झाल्यास कोंडीतून सुटका?

एमपीसी न्यूज : पुणे नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर चाकण (Chakan) येथील तळेगाव चौकात (Talegaon Chauk road) रस्त्याच्या लगतचे सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे चौकात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागू नयेत आणि वाहने चौकातून पुढे सहजपणे पास व्हावी असा उद्देश आहे. मात्र या उपाययोजना फारशा परिणाम कारक ठरत नसल्याचे साततच्या वाहतूक कोंडीने स्पष्ट होत आहे. त्यामुळे चाकण मधील प्रस्तावित बाह्यवळण मार्ग आणि रिंगरोड झाल्यास या महामार्गांची प्रस्तावित कामे होण्यापूर्वी मोठ्या कोंडीतून सुटका होईल अशी नागरिक, प्रवाशांची भावना आहे.

Abdul Sattar Statement : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कॅबीनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या रस्त्यामुळे याभागातील वाहतूक कोंडी दूर होऊन राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग,पुणे मुंबई द्रुतगती मार्ग याची थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी देवाची, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोलेगाव आणि मावळ तालुक्यातील परंदवाडी, उर्से, तळेगाव दाभाडे, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे, या गावांतून रिंगरोड जाणार आहे. या रिंग रोड मुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चाकण औद्योगिक भागातील (Chakan midc) वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण जवळील रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी भागातून प्रस्तावित बाह्यवळण मार्गाची हद्द निश्चिती करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. मागील अनेक वर्ष पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) या बाह्य वळण मार्गाच्या बाबत आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात जागेवर काडीही हललेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.