Pune News : ईएसआयसी देखील पालिकेच्या मदतीला, दिले 100 बेड

0

एमपीसी न्यूज : शहरातील कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती महापालिकेने बिबवेवाडी येथील ‘एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ ( ) रुग्णालयास केली आहे. या विनंतीला रुगणालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच 100 बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

शहरात दिवसेंदिवस कोवीड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच पालिकेच्या कोविड हेल्पलाईनद्वारेही बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घाबरून जात आहेत. त्यामुळे बेडची संख्या वाढविण्याशिवाय प्रशासनासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या रुग्णालयांमधील बेड कोविडसाठी उपयोगात आणण्याच्या प्रयत्नात प्रशासन करत आहे.

याचाच एक भाग म्हणून बिबवेवाडीतील इएसआयसी रुग्णालयामधील बेड शहरातील कोवीड रुग्णालयांवर उपचार करण्यासाठी मिळावेत, अशी मागणी महापालिकेने केली होती. या मागणीला इएसआयसीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपलब्ध असलेले ७० ऑक्सिजन बेड महापालिकेच्या ताब्यात येणार असून त्यामध्ये आणखी ३० बेडची भर टाकली जाणार आहे.

त्यामुळे या ठिकाणी १०० ऑक्सीजन बेड उपलब्ध होणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. तत्पूर्वी, ईएसआयसी रुग्णालयात ७० ऑक्सिजन खाटा आहेत. त्यांना पालिकेकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. याठिकाणी किचन, लॉड्रीची व्यवस्था केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment