Pune : महापालिकेतर्फे स्वतंत्र क्षयरोग कक्षाची स्थापना

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील क्षय रुग्णांवर प्रभावीपणे वैद्यकीय उपचार करून क्षयमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र क्षयरोग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना दवाखाना) येथील तळमजला येथे या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत कक्षाचे काम चालणार आहे. या ठिकाणी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून, जागतिक आरोग्य समस्येने प्रभावित झालेला आहे. झोपडपट्टी, शाळा, महाविद्यालये, एसटी स्टँड, रेल्वे स्थानके, अनाथलये, जेल, वृद्धाश्रम, बांधकाम मजूर ज्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी महापालिकेतर्फे क्षयरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.