मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Break The Silence : आत्महत्या आणि बलात्कारास प्रतिबंध करण्यासाठी पुण्यात ‘ब्रेक द सायलेन्स’ संघटनेची स्थापना

एमपीसी न्यूज – पुण्यातील ‘ब्रेक द सायलेन्स’ (Break The Silence) या संस्थेने आत्महत्या तसेच बलात्कारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर मोहीम सुरू केली असून विविध उपक्रमांद्वारे जनसामान्यांमध्ये विविध स्तरावर जनजागृती करण्याच्या हेतूने संघटना स्थापन करत असल्याची घोषणा अध्यक्षा प्रिया सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली.

संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा गायत्री चडवा, उपाध्यक्षा नयना हिराणी, कार्यकारी संचालक नीलम खंडाळे आणि मनोज हिराणी, डॉ. भूषण काळे मयुरेश कदम, आणि राजस चौधरी यांनी राजदूत म्हणून पदभार स्वीकारला असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

Goki Fitness Challenge : ‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा पोलीस आयुक्त शिंदे यांच्या हस्ते बक्षिस वितरण

जनजागृती आणि समाजात बदल घडवण्यासाठी (Break The Silence) देशभरातील युवा, विद्यार्थी आणि स्वयंसेवक संघटनेत सामील झाले असल्याचं त्यांनी नमूद केलं. सीतारामन म्हणाल्या, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या अहवालानुसार देशात सर्वाधिक आत्महत्या आणि बलात्काराच्या घटना या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यानंतर तमिळनाडू आणि मध्यप्रदेशात आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. तसेच, ब्युरोनुसार बलात्कार हा चौथा सर्वात सामान्य गुन्हा आहे आणि भारतात 2021 मधे 30,000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी जवळजवळ दररोज 86 आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 20% ची लक्षणीय वाढ झाली आहे. अन्यायाविरुद्ध ठोस पाऊल फक्त राज्यपातळीवर न उचलता ही मोहीम देशव्यापी असणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

ब्रेक द सायलन्स अंतर्गत देशभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी संघटना कटिबद्ध असून समाजात किंवा आपल्या आसपास असलेल्या अत्याचार ग्रस्त अथवा नैराश्य ग्रस्त व्यक्तींशी संवाद साधून त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी तसेच लैंगिक अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी संघटनेचे धोरण आणि दृष्टी विचारात घेऊन संघटनेचे ध्येय पूर्ण करण्याची शपथ या वेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. संघटनेशी संलग्न होऊन कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींनी समाज माध्यमावरील ‘ब्रेक द सायलेन्स’च्या पेजवरून संपर्क साधण्याचे आवाहन प्रिया सीतारामन यांनी केले आहे.

Latest news
Related news