Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेस, मराठ्यांना फसवणारा पक्ष ; दिवाळीच्या पाडव्याला करणार नवीन पक्षाची स्थापना – सुरेश पाटील

एमपीसी न्यूज : मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वर मंदिरात करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली आहे.

या पक्षात कोणताही अध्यक्ष नसणार तर शंभर जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार आहे या कोअर कमिटीत निवृत्त आयएएस आणि आयपीएसचा समावेश असणार आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

राज्यात 40 टक्के मराठा समाज आहे. माञ कॉग्रेस आणि राष्ट्रवादीनं मराठा समाजाची फक्त फसवणूक केली, तर भाजप सरकारनं देखील तेच केलं. यामुळं समाज वैफल्यग्रस्त झाला असून, सर्वांनी मिळून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर आमचा पक्ष हा खासदार उद्यनराजे भोसले यांच्या पाठीशी उभा राहणार असून ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना मदत करणार आहोत. असे देखील पाटील म्हणाले ते आज पुण्यात पत्रकार पत्रकारांशी बोलत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.