Pune: सर्व्हे करुनही समूहसंघटिका, समुपदेशिकांना रजा नाही- दीपाली धुमाळ

Even after conducting a survey, there is no leave for community organizations and counselors says Deepali Dhumal

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूहसंघटिका, समुपदेशिका यांना 1500 कुटुंबांचा सर्व्हे केल्यानंतर काही दिवस सुट्टी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. गेल्या 3 महिन्यांपासून 2 ते 3 हजार कुटुंबांचा सर्वे केला आहे. तरीही त्यांना कसल्याही प्रकारची रजा देण्यात आली नाही. रजा घेतल्यास मानधनात कपात केली जात आहे. या समूहसंघटिका, समुपदेशिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुण्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 6500 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोनाचा जेव्हा एक रुग्ण सापडला.

तेव्हापासून म्हणजेच गेल्या 70 दिवसांपासून समाज विकास विभागातील मानधन तत्वावर काम करणारे 90 समुहसंघटिका, समुपदेशीका /सेवा केंद्र समन्वयक 15 असे सर्वजण कार्यरत आहेत.

आरोग्य विभागामार्फत झालेल्या बैठकीत फक्त वस्ती पातळीवरील सर्व्हे करण्याचे फक्त काम करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या. त्यापासून आजतागायत त्यांच्याकडून विवीध कामे आरोग्य विभागाकडून करुन घेतली जात आहेत.

कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसताना कोरोना रुग्णाला अलगीकरण /विलगीकरण करण्यासाठी रुग्णाबरोबर पाठवले जात आहेत. साधारणपणे 1500 कुटुंबाचा सर्व्हे केल्यानंतर त्यांना काही दिवस सुट्टी दिली जाईल, असे सांगितले होते.

गेले 3 महिने 2 ते 3 हजार कुटुंबाचा सर्वे केला तरी, त्यांना कसल्याही प्रकारची रजा नाही. रजा घेतल्यास मानधन कमी करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी पत्रकारांना दिली.

ना सॅनिटायजर, ना मास्क अशा परिस्थितीत त्यांनी सर्व्हे केला आहे. आत्तापर्यंत 3 मुली कोरोनामुळे क्वारटाईंन केलेल्या आहेत. त्यापैकी 2 निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह निघाली आहे.

खातेअधिकारी यांचेकडे त्यांच्या अडचणी मांडल्या. तर याबाबत काही करू शकत नाही, याबाबत तुम्ही आरोग्य विभाग, अतिरिक्त आयुक्त नाहीतर आयुक्त यांच्याकडे तक्रार करा, अशाप्रकारे संबंधीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

त्या सर्वांना पुणे महानगरपालिके मार्फत पूर्ण संरक्षण मिळावे, मनपाने ज्या सुविधा कायम सेवकांना दिलेल्या आहेत, त्यांचा लाभ मिळावा, त्यांना वेठबिगारी प्रमाणे वागणुक देवू नये, तसेच त्यांचे मानधन कमी करण्यात येवू नये.

समाज विकास विभागाकडील समुहसंघटिका, समुपदेशिका, सेवा केंद्र समन्वयक या सेवकांना महानगरपालिकेमार्फत पूर्ण संरक्षण मिळावे. आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशा अनेक मागण्या दीपाली धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.