Pune : न्यायालयाच्या आदेशानंतरही डीजे सुरूच

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे डॉल्बी वाजवण्यास बंदी घातली आहे. त्यानंतरही गणेश मंडळांचे न्यायालयाचे बंधन झुगारून डीजे वाजवण्याचे सुरूच आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर पुण्यातील जवळपास सव्वाशे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पण तरीही शहरातील अनेक  गणेश मंडळ डीजे वाजवण्यास आग्रही असल्याचे दिसत आहेत.

मिरवणुकीत शास्त्री रोडवर सहकार मित्र मंडळ आणि राणाप्रताप मित्र मंडळासमोर डीजे जोरात सुरू आहे. तर कुमठेकर रोडवर देखील चित्रशाळा मित्र मंडळ डीजे डॉल्बी घेऊन मिरवणुकीत दाखल झाले आहेत. मात्र, येथे मानाचे पाचही गणपती मार्गस्थ झाल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी दिला होता. मात्र, अद्यापतरी कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे वृत्त नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like