_MPC_DIR_MPU_III

FASTag नसला तरी ‘हे’ केल्यास भरावा लागणार नाही दुप्पट कर !

एमपीसी न्यूज : वाहनचालकांसाठी फास्टॅग (FASTag) आवश्यक आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जर तुमच्या कारचे फास्टॅग योग्यरित्या कार्यरत नसेल किंवा त्यामध्ये शिल्लक नसेल तरी देखील टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला दुप्पट कर आकारला जाईल.

_MPC_DIR_MPU_IV

आदेशानुसार, एखादी खासगी कार किंवा टॅक्सी चालवायची असेल तर वाहनचालकांकडे फास्टॅग असणं आवश्यक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने काही सूट दिल्यानंतर सर्व गाड्यांवर फास्टॅग अनिवार्य केला होता. अलीकडेच जुन्या गाड्यांवर देखील FASTag अनिवार्य करण्यात आला आहे.

जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा (Prepaid touch and go card service) वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही प्री-पेड कार्ड्स रोखीच्या व्यवहारास पर्याय ठरणार आहेत. जर तुमच्या गाडीवर FASTag नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स (PoS) कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता आणि FASTag ऐवजी हे कार्ड वापरल्यास टोल दुप्पट होणार नाही.

_MPC_DIR_MPU_II

FASTag नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. मात्र या दरम्यान एक अपडेट आले आहे, सध्या दुप्पट टॅक्स वसूल केला जाणार नाही आहे.

1 जानेवारी 2021 पासून टोल नाक्यावरील सर्व कॅश लेन डेडिकेटेड FASTag लेनमध्ये रुपांतरित केल्या जातील. ही सुविधा हळू हळू फास्टॅग लेनमधील सर्व लेनमध्ये रूपांतरित केली जाईल. यामुळे कोणत्याही टोल प्लाझावर रोख पैसे घेतले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे फास्टॅग नसल्यास, आपली कार टोल पार करू शकणार नाही. फास्टॅग न लावणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल कर वसूल करण्याची सरकारची योजना होती. परंतु या विशेष सेवेचा वापर करून, फास्टॅग नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचू शकता.

इतकेच नाही तर हे प्रीपेड कार्ड फास्टॅग नंतरही वापरता येते. FASTag ब्लॅकलिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास टोल कर भरण्यास या कार्डचा वापर करता येईल. प्री-पेड कार्ड खरेदी आणि रिचार्जसाठी प्रत्येक टोल नाक्यावर दोन PoS तयार केले जातील. कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहक ते नेट बँकिंगद्वारे किंवा पीओएस वर रिचार्ज करू शकतात. प्रत्येक टोलनाक्यावर रोखीच्या व्यवहारासाठी सध्या दोन लेन आहेत, परंतु 1 जानेवारीपासून या लेनही बंद ठेवल्या जाणार आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.