Pune : साखर आयुक्त झालो तरी, चहात घेण्यापुरतीच साखर कळते – सौरभ राव

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत दोन वर्षे आयुक्त असताना खूप काही शिकायला मिळाले. पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. या अनुभवाच्या जोरावर मी आता कुठेही काम करू शकतो. साखर आयुक्त झालो तरी, चहात घेण्यापूरतीच साखर कळत असल्याची स्पष्ट कबुली नवनियुक्त साखर आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी दिली.

पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहात नवीन आयुक्त शेखर गायकवाड यांचे स्वागत आणि सौरभ राव यांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी जोरदार बॅटिंग केली.

शेखर गायकवाड म्हणाले, पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मुख्यमंत्र्यांसोबत काम केल्याने लोकप्रतिनिधींशी जुळवून घेता येते. आगामी काळात विविध योजना राबविण्याचा संकल्पही त्यांनी केला. तर, उद्या (गुरुवारी) मुंबईत साखरे संबंधी बैठक आहे. त्यावेळी गायकवाड (साहेब) यांना मी सोबत येण्याची विनंती केली आहे. तीन तासांच्या प्रवासात मी महापालिकेची आणि गायकवाड मला साखरेची माहिती देणार, असे सौरभ राव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.