Pune : अखेर त्या 23 गावांतील रस्तारुंदीकरणाला मिळणार चालना

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील अरुंद रस्त्यांच्या आणि वाढत्या अपघातांच्या गंभीर बनलेल्या प्रश्नातून आता नागरिकांची सुटका होणार आहे. पालिका प्रशासनाने या गावांमधील रस्तारुंदीकरणाबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक अभिप्राय सादर करण्याचे आश्वासन माजी उपमहापौर आबा बागुल यांना दिले आहे.

पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील अरुंद रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शेकडो नागरिकांचे अपघातात बळी जात आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी महात्मा गांधी जयंतीदिनी मंगळवारपासून पालिका आवारात उपोषणास बसण्याचा इशारा आबा बागुल यांनी दिला होता. तत्पूर्वी प्रशासनाने समाविष्ट २३ गावांमध्ये रस्तारुंदीकरणाबाबत सकारात्मक अभिप्राय येत्या १५ दिवसांत सादर करण्याची ग्वाही देऊन गावांमधील रस्तारुंदीकरणाचा आराखडा तयार असून, प्रस्तावित रस्त्यांबाबत सविस्तर विश्लेषण करण्यात येणार आहे.

त्यामुळे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती पालिका प्रशासनाने पत्राद्वारे केली आहे, याबाबत आबा बागुल म्हणाले, ज्यावेळी २३ गावे महापालिकेत समाविष्ट हााली, त्यावेळी या गावांमधील रस्ते दिडपट रुंद करण्याची मागणी वाढत्या लोकसंख्या आणि नियोजनाच्या दृष्टीने केली होती. या गावांचा विकास आराखडा करताना रस्तारुंदी ही दर्शविण्यात आली होती. त्यामुळे नियोजित रस्तारुंदीकरणासंदर्भात बिषय मांडण्यात आला होता.

मात्र, स्थायी समितीने तो खास सभेकडे वर्ग केला होता. मात्र, प्रशासनाने रस्तारुदीकरण आवश्यक असल्याचा प्रस्तावा सादर केलेला असताना, तो फेर अभिप्रायासाठी पाठविण्याचा स्थायी समितीने घेतले निर्णय दुर्दैवी आहे. विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे जागेवर रस्तेआखणीबाबत सरकारने अनुकूल निर्णय घेण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.