Nigdi News: कर्णबधिर विद्यार्थ्यांना इव्हरसीन इंडियाची मदत

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे , मॉडर्न हायस्कूल या युनिटमधील कर्णबधिर मुलांना शिक्षकांनी केलेले अध्यापन व्यवस्थित ऐकू  यावे यासाठी विमाननगर येथील इव्हरसीन इंडिया कंपनीने पुढाकार घेतला. प्रत्यक्षात कर्णबधिर युनिटला भेट देऊन या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामधील अडचणी जाणून घेतल्या. या मुलांना  नव्वद हजार रुपये किंमतीची चार नवीन श्रवणयंत्र देण्यात आली.

यावेळी युनिटच्या शिक्षिका कुसुम पाडळे यांनी विद्यार्थ्यांना श्रवणयंत्राची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ इव्हरसीन कंपनीच्या वतीने या मुलांना  नव्वद हजार रुपये किंमतीची चार नवीन श्रवणयंत्र देण्यात आली. या श्रवणयंत्रामुळे मुलांना परिणामकारक अध्ययन करता येणार असल्याचे मुख्याध्यापक गोकुळ कांबळे यांनी सांगितले. या यंत्रामुळे मूकबधिर मुलांना देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यास मदत होणार असल्याचे मत शरद इनामदार यांनी व्यक्त केले.

श्रवणयंत्र  वाटपासाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलन हॉर्ले , मॅनेजिंग डायरेक्टर जॉनथन बुर्के , डायरेक्टर प्रोमित संन्याल , सिनिअर मॅनेजर अभिजीत परभने, प्रशिक्षक सुगंधा रॉय यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास कंपनीच्या  सुगंधा रॉय , नगरसेवक सचिन चिखले ,शरद इनामदार , गोकुळ कांबळे , राजीव कुटे ,कुसुम पाडळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.