Maval : सर्व स्तरातील मतदार महायुतीच्याच सोबत – सदाशिव खाडे

पिंपरी चिंचवड शहर परिसरात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात

एमपीसी न्यूज- कष्टकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी अशा सर्व स्तरातील मतदार शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्याच सोबत आहेत. महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे सर्व स्तरातून पाठिंबा आणि शुभेच्छा मिळत आहेत, असे मत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी व्यक्त केले.

शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यातील प्राधिकरण येथील बैठकीत खाडे बोलत होते. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर आर एस कुमार, माजी उपमहापौर, नगरसेविका शैलजा मोरे, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळ उपसभापती शर्मिला बाबर, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक अमित गावडे, राजेंद्र बाबर, कैलास कुटे, सुनील कदम, भावीत देशमुख, उर्मिला काळभोर, सरिता साने, प्रसाद अष्टेकर, माऊली थोरात, गीता आफळे, अविनाश नवले आदी उपस्थित होते.

सदाशिव खाडे म्हणाले, “येत्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून काहीही वावड्या उडवल्या जातील. महायुतीच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्याने त्याला बळी पडू नये. कार्यकर्त्यांनी त्या वावड्यांकडे दुर्लक्ष करून निष्ठेने काम करावे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी राबविलेल्या विविध योजना, विकास प्रकल्प सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावेत.”

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “केवळ टीकात्मक बोलून विरोधकांकडून प्रचार केला जात आहे. कारण विरोधकांकडे बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. विकासकामाचे नियोजन नाही. त्यांनी त्यांच्या काळात कोणत्याही योजना राबवल्या नाहीत. महायुतीने मागील पाच वर्षांच्या कालावधीत विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन काम केलं आहे. विरोधकांनी कार्यकर्त्यांचा केवळ वापर केला. तर महायुतीच्या घटक पक्षांनी कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली.”

चिंचवड येथील बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, “कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी घरोघरी पोहोचावे. प्रचाराचे सुयोग्य नियोजन करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी देखील आपण प्रयत्न करायला हवेत. मतदान हा नागरिकांचा अधिकार आहे. तो त्यांनी गमावता कामा नये. यासाठी मतदारांना मतदान करण्यासठी प्रवृत्त करून मतदान वाढवावे.”

रविवारी (दि. १४) काळेवाडी येथील महात्मा उद्यानातून प्रचारास सुरुवात झाली. उद्यानात मोर्निंग वॉक केल्यानंतर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटीचा दौरा सुरु झाला. यामध्ये राज्यसभा खासदार अमर साबळे, नगरसेविका सविता खुळे, नगरसेविका सुनीता तापकीर, माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील, सुरेश नखाते, प्रमोद ताम्हणकर, विलास गवळी, दिलीप नखाते, कुमार केशवराव जाधव, आप्पा नरळकर, मंगेश नढे, अरुण आंब्रे, दीपक नढे, अनिल पालांडे, नर्गिस शेख, सोमनाथ तापकीर, निवृत्ती नखाते, राजू नखाते, चंद्रकांत नखाते, मल्हारी देशमुख, भरत साळुंखे आदींच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, भिमाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, श्री गणेश तरुण मित्र मंडळ, एक्रोपोलीस सोसायटी, स्मृती संकुल सोसायटी, ग्रीन्स सोसायटीला भेट दिली. जगन्नाथ गुरकुडकर, अरुण वानखेडे, सुरेश दळणे, स्वप्नील दळणे यांच्या गार्डन ग्रुपने बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.