Chinchwad : स्वच्छता व सुरक्षाबाबत प्रत्येकाने दक्ष राहण्याची आवश्यकता – एस.जे. कुंभार

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चिंचवड रेल्वेस्थानक कर्मचारी व प्रशासन व चिंचवड प्रवासी संघ यांच्या संयूक्त विद्यमाने चिंचवड रेल्वेस्थानक व परिसरातील प्रवासी व नागरिकांसाठी स्वच्छता जनजागृती अभियान संपन्न झाले. याप्रसंगी मध्यरेल्वे विभागाचे निरीक्षक एस.जे. कुंभार बोलत होते.

यावेळी चिंचवडस्थानक प्रमुख ए.एम. नायर, सहाय्यक अमित वर्मा, चिंचवड आरक्षण केंद्र प्रमुख मंजुळा पुक्कोटिल, रेल्वे पोलिस उपनिरीक्षक बी.डी.सागर, मुकेश चुडासमा, सुरज आसदकर, जीगर व्यास, हार्दिक जानी, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. मनिषा पाटील, डॉ. सुषमा खंडाळे, प्रा. सुशिला भोग, प्रा. जितेंद्र वाघमारे, प्रा. संतोष उमाटे, प्रा. अस्मिता यादव आदी उपस्थित होते.

यावेळी रेल्वेस्थानकावर प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण, प्लास्टिक हटाओ, कचरामुक्त परिसरबाबत सुमारे 30 विद्यार्थीनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. त्यावेळी चिंचवड प्रवासी संघाने अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी स्वच्छतेची शपथ उपस्थितांना दिली.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या आवारात संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा व प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांनी स्वच्छता अभियानाचे उद्घाटन झेंडा दाखवून केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी ‘नको प्लास्टिक, नको कचरा, स्वच्छ भारत आमचा नारा, प्लास्टिक को हटाना है।’ आदी जनजागृती विषयी फलक हातात घेत घोषणाबाजी करीत काळभोरनगर ते चिंचवड रेल्वेस्थानक पर्यंत रॅली काढण्यात आली. घोषणाबाजीने सर्व परिसर दुमदुमून गेला. लोकांमध्ये जनजागृती केली.

कुंभार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, आम्ही पुणे-लोणावळादरम्यान रेल्वे इंजिनातून पाहणी केली असता, दुतर्फा बाजूने अनेक ठिकाणी प्लास्टिक आदी कचरा ओढ्याच्या आसपास कायमस्वरूपी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे पुराचे पाणी तूंबुन ते नागरीवस्तीत पूराचे पाणी जात आहे, यासाठी नागरीकांनी प्लास्टिक, कचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी, तसेच आकुर्डी परिसरात काही कॉलेजचे तरूण-तरूणी विद्यार्थी कानामध्ये एअरफोन घालून रेल्वेरुळावरून जीव धोक्यात घालून जातात, त्यामुळे अपघात देखील झाले आहेत. यासाठी सुरक्षा बाळगावी, असे शेवटी म्हणाले.

चिंचवड रेल्वेस्थानक प्रमुख ए.एम.नायर म्हणाले, आज बी.एड. शिक्षकांचा अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जी जनजागृती केली. ती कौतुकास्पद असून एका शिक्षक व शिक्षिकांनी दहा विद्यार्थ्यांना स्वच्छता व प्लास्टिकचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविले तर, शहर स्वच्छ होईल. चिंचवड रेल्वेस्थानकावरून दररोज 12 ते 15 हजार प्रवासी चढ-उतार करतात. कचरा, कचरापेटीतच टाकण्याचे आवाहन करून आपले रेल्वेस्थानक स्वच्छतेबाबत सर्वांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

चिंचवड रेल्वे स्थानकातील प्रवासीयांना विद्यार्थ्यांनी कागदी व कापडी पिशव्या मोफत वाटण्यात आल्या त्याचे उत्फूर्त स्वागत प्रवासीयांनी केले.महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी प्रस्तावना केली व आभार प्रा. अस्मिता यादव यांनी मानले. स्वच्छता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र नलावडे, शेरबहाद्दूर सोनार, दीपक सोनावणे आदींनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.