Maval : पक्षवाढीसाठी सर्वांनी एकसंधपणे काम करावे – गजानन चिंचवडे 

एमपीसी  न्यूज – शिवसंपर्क अभियान संपूर्ण मावळ लोकसभा  मतदारसंघात राबवले जाणार असून यावेळी शाखांना भेटी देण्यात येणार आहेत. पक्षवाढीसाठी सर्वांनी एकसंधपणे काम केले पाहिजे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे  केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून मावळ लोकसभा मतदार संघामध्ये शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते.  या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात मावळ तालुक्यामधील कार्ला येथील एकविरा देवीमातेचे दर्शन घेऊन करण्यात आले. नाणे मावळचा पश्चिमभाग कुसगाव-वरसोली व लोणावळा विभागातील शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांसमवेत संवाद साधण्यात आला.

मावळ महिला आघाडी संपर्कप्रमुख लतिका  पास्ते, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, संघटक सुरेश गायकवाड, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख महेश केदारी, लोणावळा नगरपरिषद विरोधी पक्षनेत्या, लोणावळा शिवसेना महिला आघाडी संघटिका शादान चौधरी, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, लोणावळा शहरप्रमुख सुनिल इंगुळकर,  महिला आघाडी सहसंघटिका संगिता कंधारे, उपसंघटिका अनिता गोणते, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, कुसगाव-वाकसई विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, कुसगाव विभागप्रमुख अशोक निकम, वाकसई विभागप्रमुख काळू हुलावळे,  कुसगाव-वाकसई, शहरसंघटक सुभाष डेनकर , समन्वयक जयवंत दळवी,  उपशहरप्रमुख मनेष पवार,  प्रकाश पाठारे, युवासेना लोणावळा शहरप्रमुख तानाजी सुर्यवंशी, भा. वि. सेना शहरसंघटक शाम सुतार, महिला आघाडी उपशहर संघटक दिपाली भिलारे,  मनिषा भांगरे , विभाग संघटक सुरेखाताई फाटक, लोणावळा शहर व कुसगाव वरसोली विभागातील  सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी , आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, शिवसंपर्क अभियानामध्ये राजकारणापेक्षा हि समाजहिताचा विचार करून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अखंड लढणारी संघटना म्हणजे शिवसेना. ८०% समाजकारण या हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेला अनुसरून समाजामध्ये विविध क्षेत्रात लोकाभिमुख कार्य करणारे मान्यवर यांच्या देखील भेटी गाठी घेण्यात येणार आहेत. त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या.

नाणे मावळचा पश्चिम भाग म्हणजे कुसगाव वरसोली, या भागात जवळपास ३०.००० व लोणावळा शहरात ६०,००० लोकसंख्या असून या ठिकाणी गावागावात जाऊन त्या परिसरातील समस्या , प्रलंबित शासकीय कामे व त्यांचा पाठपुरावा, अडचणी लक्षात घेऊन , सर्वांना विश्वासात घेऊन शिवसेना पक्षबांधणी , आंदोलने याबाबत दिशा ठरविण्यासाठी येथे आल्याचे सांगितले . छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने विश्वासू मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याच विचाराने प्रेरीत होऊन हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वासू शिलेदारासह शिवसेनेची स्थापना केली.  शिवसेना म्हणजे अन्याया विरुद्ध लढणारी राजकारणापेक्षा समाजसेवेसाठी वाहून घेणाऱ्या शिवसैनिकांची संघटना असून सर्व शिवसैनिकांनी “हिंदू हृदयसम्राटांचे विचार मनामनात, शिवसेना गावागावात, शिवसैनिक घराघरात”  या संकल्पनेने प्रेरीत होऊन घरोघरी जाऊन जनसामान्यांपर्यंत हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेनेची भूमिका पोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी  महिला आघाडीच्या मावळच्या सहसंपर्क प्रमुख ललिता पास्ते व पिंपरी-चिंचवड महिला आघाडी संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला व त्यांनी महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणी बाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन उपशहरप्रमुख संजय भोईर यांनी केले. आभार कुसगाव विभागप्रमुख अशोक निकम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.